मुंबईत चाचण्यासोबत रुग्णसंख्येतही घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत चाचण्यासोबत रुग्णसंख्येतही घट
मुंबईत चाचण्यासोबत रुग्णसंख्येतही घट

मुंबईत चाचण्यासोबत रुग्णसंख्येतही घट

sakal_logo
By
मुंबईत चाचण्यांसोबत रुग्णसंख्येतही घट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १० : मुंबईत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक चाचण्या करण्याचे निर्देश सरकारने आरोग्य विभागाला दिले आहेत; मात्र रविवारी मुंबईत झालेल्या ६८ हजार २४९ चाचण्यांच्या तुलनेत आज ५९ हजार २४२ चाचण्या करण्यात आल्या. परिणामी नव्या रुग्णसंख्येतही घट झाली. आज मुंबईत १३ हजार ६४८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ हजार ३२८ रुग्ण लक्षणविरहित आहेत. दरम्यान, आज मुंबईत केवळ पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर २७ हजार २१४ रुग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत ८,०५,३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top