आयआयटीकडून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी
हवामान जागृतीसाठी प्रयोग सादर करण्याचे आवाहन
मुंबई, ता. ११ ः आयआयटी मुंबईकडून शाळांमध्ये आभासी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबई आयआयटीच्या अभ्युदय उपक्रमाअंतर्गत हवामान बदलासंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा राष्ट्रव्यापी उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी कल्पक प्रयोग सादर करू उच्छिणाऱ्या विद्यार्थ्यंना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला हवामान बदलाबाबत जागरूक करणे आणि ही समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे ते समजावून सांगणे हा या हेतू आहे. विद्यार्थ्यांनी या समस्येवरील उपाय सुचवणारे कल्पक प्रयोग सादर करायचे आहेत. प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे. त्यांच्यामधून प्रथम तीन क्रमांक निवडून त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थी आणि शाळेला प्रमाणपत्रसुद्धा दिले जाईल. अभुदय उपक्रमात २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमिषा कान्हेकर ८२०८६५१०१६ आणि रजनी मीना ८८२४३८७२५४ यांच्याशी संपर्क करावा.
...