संमित्र मंडळ

संमित्र मंडळ
सन्मित्र ललित कला मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर निरनिराळ्या उपक्रमांमुळे ''सन्मित्र ललित कला मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर ठरली आहे. या संस्थेतर्फे दर वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्तरिय एकांकिका स्पर्धा (कै. पु. नि. देव स्मृती सन्मित्र चषक ) होते. कितीही प्रवेशिका आल्या तरी पहिल्या ३० प्रवेशिका स्वीकार सादर केल्या जातात. १९९४ मध्ये पेण येथील देव आळीतील काही मुलांनी एकत्र येऊन काहीतरी सामाजिक व शैक्षणिक कार्य करावे आणि त्यासाठी एखादे व्यासपीठ किंवा संस्था असावी, असा विचार करून सन्मित्र या ललित कला मंडळाची स्थापना केली. पहिलाच उपक्रम रक्तदान शिबिर भरवण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे, रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे, रक्त बाटल्या रक्तपेढीत जमा करणे हे करतच त्यांनी रक्तगट सूची काढली. त्यात तज्ज्ञांचे लेख व रक्तगट यादी छापून, ती सूची पेणमधील सर्व डॉक्टर व सर्व औषधविक्रेत्यांना मोफत दिली. ''सन्मित्र'' च्या रक्तगट सूचीचा अनेक गरजू रुग्णांना फार मोठा फायदा होत आहे. ''सन्मित्र'' तर्फे दरवर्षी दीपावलीनिमित्त रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जाते. पहिल्या तीन क्रमांकाना पारितोषिक देऊन कलाकारांना उत्तेजनही दिले जाते. दर वर्षी १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त बाल चित्रकला, बाल वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. २६ व २७ डिसेंबर १९९४ रोजी ग्रंथाली प्रकाशित पु. ल. देशपांडे यांच्या समग्र लेखनासह ग्रंथांचे प्रदर्शनी आयोजित केले होते. ''एक कलाकार व एक संध्याकाळ'' या कार्यक्रमांमुळे रसिक प्रेक्षक तृप्त होऊन जातात. या कार्यक्रमात प्रशांत दामले, कविवर्य वसंत बापट, ''राशिचक्र'' कार शरद उपाध्ये, कमलाकर वैशंपायन, राजा मयेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, रूही बेर्डे, अशोक सराफ, सच्चिदानंद शेवडे, व्यंगचित्रकार विकास सबनीस, मंगेश पाडगावकर, रंगनाथ कुलकर्णी यांना आपापले बहारदार कार्यक्रम, प्रकट मुलाखती, काव्यवाचन, व्याख्यान इत्यादींनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय दरवर्षी ''सन्मित्र'' तर्फे टेबल टेनिस व बुद्धिबळ स्पर्धा तसेच नाट्य स्पर्धाचे आयोजन केले जाते. पद्मश्री अनुताई वाघ आश्रमशाळा, ''अंकुर'' या समाजसेवी संस्थेने चालविलेल्या ''झेप'' ही आदिवासी (कातकरी) वसतिगृह, सावरसई आदिवासी आश्रमशाळा आदींना अनुक्रमे शालेय वस्तू, मोफत कपडे, पादत्राणे, विद्युतीकरण खर्च इत्यादी मदत आवश्यकतेनुसार ''सन्मित्र'' कडून केली जाते. १९९४ पासून ''सम्मित्र'' ही संस्था शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे. दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्यानेच वाटचाल करीत असल्याने या संस्थेस व्यक्ती व संस्थांनी सढळपणे आर्थिक मदत करून संस्थेच्या विविद उपक्रमांना हातभार लावावा, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष सुहास तेरवाडकर यांनी केली आहे. -य. भि.तेरवाडकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com