जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय
जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय

जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय

sakal_logo
By
जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा नोंदणी केलेली ३० टक्के औषधेच उपलब्ध; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात २०२०-२१ मध्ये नोंदणी केलेली केवळ ३० टक्के औषधेच रुग्णालयात उपलब्ध झाली असून कोरोना रुग्णांसाठी लागणारी सर्व औषधेही रुग्णालयात उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, याबाबत आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र दिले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह राज्यातून वैद्यकीय उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात आहे, परंतु रुग्णालयात एन्ट्रानील, सायट्रेट इंजेक्शन, अॅमोक्सिन क्लॅव्ह इंजेक्शन, अॅन्टी स्नेक व्हेनेम, हेपॅटायटिस बी, इम्युनिग्लोबिन, पॅरासिटामोल, स्टराईल वॉटर तसेच कोरोना रुग्णांसाठी लागणारी सर्व औषधीही उपलब्ध नसल्याचे आमदार नार्वेकर यांनी पत्रातून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. रुग्णालयात साधे ग्लोव्हजही बाहेरून आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. हा सरकारचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असून हजारो रुग्णांच्या जीवाशी चालवलेला खेळ तात्काळ थांबवून जे. जे. रुग्णालयात औषधपुरवठा सुरळीत करावा, तसेच याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार नार्वेकर यांनी केली आहे. पुरवठादारांची पाठ १) गेल्या अनेक वर्षांपासून औषध पुरवठादारांचे थकीत देयक सरकारकडून दिले गेले नसल्याने औषध पुरवठादारांनीही रुग्णालयांना औषध पुरवण्याकडे पाठ फिरवली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही डीएमईआरचे सेक्रेटरी आणि सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हाफकिनसह ज्यांनी डीएमईआरकडे औषधपुरवठा केला, त्यांचे किमान ९० कोटी रुपये बाकी आहेत; तर ज्यांनी थेट डीएमईआरअंतर्गत पुरवठा केला होता त्यांचे किमान ४० कोटींचे देयक बाकी आहे. २) रुग्णालयात बरीचशी औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे औषधांचा तुटवडा भासत आहे, असे ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले; तर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून औषधांचा पुरवठा रुग्णालयांना करत आहोत. अजूनही आमची देयके पूर्ण झालेली नाहीत. डीएमईआर यांनीही देयकाविषयीच्या सूचना जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिल्या आहेत, पण आमची देयके अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असे पुरवठादार यांनी खासगीत सांगितले. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. त्याबाबत तजवीज सुरू केली आहे. लवकरच औषधे उपलब्ध होतील. काही औषधे अन्य सरकारी रुग्णालयांतून; तर काही औषधे खरेदी केली आहेत. थकीत बिलांबाबत पुरवणी मागणी सरकारकडे केली आहे. लवकरात लवकर थकीत देयक औषध पुरवठादार कंपन्यांना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. एकनाथ पवार, प्रभारी अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top