पोलादपुरात निवडणूक शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

पोलादपुरात निवडणूक शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

पोलादपुरात निवडणूक शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांची निवडणूक १८ जानेवारीला होणार आहे. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलादपूर शहरात सैनिकनगर येथे वॉर्ड क्रमांक ८ येथे शिवसेना शहरप्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या प्रयत्नाने संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. या कार्यालयाचे उद्‍घाटन महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, सुरेश पवार, प्रभाग क्रमांक ८ च्या उमेदवार सोनाली गायकवाड, मनोज प्रजापती, सुनील मोरे यांसह उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com