नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे
नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे

नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे

sakal_logo
By
नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या मिर-भाईंदरमधील स्वातंत्र्यसैनिकांपैकी एकमेव उत्तन येथील ऑगस्टीन कोळी आज हयात आहेत. त्यांच्या सन्मानार्थ मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नगरभवन येथील वाचनालयाला त्यांचे नावे द्यावे, अशी मागणी नगरसेविका शर्मिला गंडोळी यांनी केली आहे. स्वातंत्र्य संग्रामात मिरा-भाईंदरमधील २१ जणांनी सहभाग घेतला होता. त्यातील ऑगस्टीन कोळी हे आजही हयात आहेत. त्यांनी २०० कार्यकर्त्यांसह उत्तन तलाठी कार्यालयासमोर त्यांनी ब्रिटिशांविरोधात सभा घेऊन स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महापालिकेने भाईंदर पश्चिम येथे असलेल्या नगरभवन वाचनालयाला ऑगस्टीन कोळी यांचे नाव द्यावे, अशी मागणी शर्मिला गंडोळी यांनी केली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top