महापालिकेचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर
महापालिकेचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर

महापालिकेचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर

sakal_logo
By
महापालिकेचे अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर अनधिकृत भूमाफिया आणि फेरीवाल्यांचे धाबे दणाणले सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ११ : कोविडसारख्या वैश्विव महामारीचा गैरफायदा घेऊन शहरातील महत्त्वाच्या जागा बळकावणाऱ्या भूमाफिया आणि बेकायदा फेरीवाल्यांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम हाती घेतली आहे. कारवायांचा सपाटा लावल्याने या घटकांचे कंबरडे मोडले आहे. दहा दिवसांत सुमारे तीन हजार फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. तर एक हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आहे. कोविड रुग्णवाढीमुळे नवी मुंबई महापालिकेचे सर्व विभाग रुग्णांच्या सोयी-सुविधांच्या नियोजनात व्यस्त आहेत. गेले दीड वर्षे महापालिकेच्या आरोग्य विभागावर वाढता ताण पाहता महापालिका आयुक्तांनी इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड निर्मूलनाचे कर्तव्य नेमून दिले आहे. त्यामुळे विभाग कार्यालय व अतिक्रमण विरोधी पथकांकडून अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवरील कारवाई संथ झाली होती. त्याचा गैरफायदा काही दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या भागातील गावठाणातील भूमाफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले. अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यास सुरुवात केली. तर काही मोकळ्या भूखंडांवर विनापरवानगी बांधकामे केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. अशा अपप्रवृतींचा बंदोबस्त करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकातर्फे धडाकेबाज कारवाई सुरु करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधी पथक आणि परिमंडळ दोनचे उपायुक्त अमरिश पटनिगीरे यांनी शहरातील बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांपासून अतिक्रमण विरोधी पथकाने अक्षरशः कारवाईचा सपाटा लावला आहे. वेगवेगळ्या नोडमध्ये रोज अनधिकृत बांधकामे पाडली जात आहेत. तसेच रोजच्या रोज रस्ते, चौक आणि पदपथांवर बसून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. अतिक्रमण विरोधी पथकाने धारण केलेल्या रौद्ररुपामुळे बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. -------------------------------------- बेकायदा फेरीवाल्यांवर केलेली कारवाई १ जानेवारी १४०, २ जानेवारी - २०१, ३ जानेवारी - २६१, ४ जानेवारी - ३४९, ५ जानेवारी - ४८०, ६ जानेवारी - ४२२, ७ जानेवारी - ४२६, ८ जानेवारी - ३३९ आणि ९ जानेवारी ३०३ -------------------------------------- अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त वाशी विभागांतर्गत केरळा भवन ते वाशी हायवेपर्यंत, वाशी येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १७६ अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या. तसेच नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील दिघा विभागातील इलठणपाडा या ठिकाणी नवीन झालेल्या १५ झोपड्या हटविण्याची वनविभाग आणि महापालिकेने एम.आय.डी.सी.यांच्या सोबत संयुक्तपणे कारवाई केली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top