मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोनाची लागण
मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोनाची लागण

मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोना सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पातील ६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बाधितांमध्ये एमएमआरसीएलचे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यासह मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पोलिस, रेल्वे, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता मेट्रो-३ मधील कर्मचारीही कोरोनाबाधित होत आहेत. नुकतीच एमएमआरसीएलमधील ३५० कर्मचाऱ्यांची चाचणी केली असता, त्यातील ६८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहेत.त्यामुळे एमएमआरसीएल''ने बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची मुभा दिली आहे. तसेच कार्यालयात ५० टक्क्यांपर्यंत उपस्थिती मर्यादित केली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने दिली. -------------------------------
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top