पालघरमधील विकासकामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमधील विकासकामांना वेग
पालघरमधील विकासकामांना वेग

पालघरमधील विकासकामांना वेग

sakal_logo
By
पालघरमधील विकासकामांना वेग पालघर, ता. १२ (बातमीदार) ः पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन कोटी रुपयांच्या सतरा विकासकामांचे भूमिपूजन वनगा यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. मायखोपमधील रस्ता, केळवा - कालिका मंदिर स्टॉप ते श्री चंद्रकांत वर्तक यांच्या घरापर्यंत रस्ता, कोळगाव वंकासपाडा येथील रस्ता, उमरोळी अतुल वझे ते आदर्श नगर रस्ता, दांडी येथे खुले सभागृह, तारापूर येथील अभिजीत चोरगे ते किल्ल्यापर्यंचा रस्ता, केळवा सुभाषनगर ते पोलिस स्टेशनपर्यंत रस्ता, नवी उमरोळीतील रस्ता, परनाळी येथील रस्ता, दांडी बाराहजारी पोलिस चौकी ते कोटेवाडा रस्ता, पाचमार्ग ते पोफरण रस्ता, दहिसर मेन रोड ते खाटूकपाडा रस्ता, कुडण आदिवासी पाडा ते वेंगणे आदीवासी पाडा रस्ता, उमरोळी पंचाळी जांबूपाडा रस्ता, उनभाट रवाजनापासून सोसायटीपाडापर्यंचा रस्ता, तारापूर मार्केट मत्स्य बंदर रस्ता अशा एकूण १७ कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह, महिला जिल्हा संघटक ज्योती मेहेर, नमिता राऊत, प्रकाश निकम, माजी पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top