श्री वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा उत्साहात
श्री वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा उत्साहात

श्री वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा उत्साहात

sakal_logo
By
श्री वज्रेश्वरी देवीचा पालखी सोहळा उत्साहात पालघर, ता. १२ (बातमीदार) ः किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत श्री वज्रेश्वरी देवी पालखी उत्सवाचे जंजिरे वसई किल्ला ते सातपाटी गावापर्यंत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सातपाटीमधील प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला. सोहळ्यानिमित्त गाव-पाड्यावर आकर्षक रांगोळी व गुढीची सजावट, भगवे ध्वज व फुलांची आरास करण्यात आली होती. जंजिरे वसई किल्ल्यात किल्ले वसई मोहीम प्रतिनिधी व सातपाटी मानाचे ग्रामस्थ यांच्या हस्ते जंजिरे वसई किल्ल्यात पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. सातपाटी गावातील सर्व भागात पालखीचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. भजन मंडळींचे कीर्तन, भगवे ध्वज, अबदागिरी, फुलांची आरास, मानाची तलवार, भगवे पताके, मोठमोठ्या आकारातील रांगोळ्या, विविध वेशभूषा, घरोघरी उभारण्यात आलेले ध्वज व पताका इत्यादी माध्यमातून स्थानिकांनी श्री वज्रेश्वरी देवीस मानवंदना दिली. राम मंदिरात इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांनी ‘आदिशक्ती वज्रेश्वरी देवी व प्राचीन इतिहास’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. या मोहिमेचे सूत्रधार योगेश पालेकर यांनी या मोहिमेचे मार्गदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे दुपारी १२ वाजता केळवे जंजिरा येथे पालखीची सांगता झाली. सामाजिक संस्थांचा सहभाग या पालखी उत्सवात किल्ले वसई मोहीम परिवार, श्रीराम मंदिर संस्थान सातपाटी, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, समस्त कुडे ग्रामस्थ, हिंदवी स्वराज्य समूह शिरगाव, गडमाची ट्रेकर्स मुंबई, संवर्धन मोहीम केळवे, श्री शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी समिती पालघर, भ्रमर संस्था ठाणे, श्री स्वामी समर्थ मंडळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यानंतरही पालखी केळवे गावाकडे रवाना झाली. संवर्धन मोहीम केळवे तर्फ श्री राजा शिवछत्रपती पुतळ्यास मानवंदना देण्यात आली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top