थंडीपासून बचावासाठी गरिबांना ब्लेंकेट वाटप

थंडीपासून बचावासाठी गरिबांना ब्लेंकेट वाटप

थंडीपासून बचावासाठी गरिबांना ब्लॅंकेट वाटप घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः अवघी मुंबापुरी दाट धुक्याने आणि गुलाबी थंडीने शहारली आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने मुंबईकर ‘थंडा थंडा कुल कुल’चा अनुभव घेत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण स्वेटरचा वापर करत आहेत, मात्र रस्त्यावर, फुटपाथवर वा गरीब वस्तीत राहणाऱ्याना थंडीची हुडहुडी भरत आहे. त्यांच्यासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. घाटकोपर पूर्वेतील भाजप आमदार पराग शाह यांच्या वतीने गरीब व गरजू नागरिकांना मोफत ब्लॅंकेटचे वाटप केले. ७ जानेवारीपासून हे वाटप सुरूच असून प्रत्येक गरजूंपर्यंत ब्लॅंकेट पोहोचण्याची व्यवस्था सुरू असून आतापर्यंत हजारहून अधिक नागरिकांना वाटप झाले असल्याचे शाह यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्याध्यक्ष अशोक राय, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, विकास कामत, मंडळ अध्यक्ष रवी पुंज, सुरेश गोलतकर, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा दीपाली शिरसाट, महामंत्री अजय बागल आदी उपस्थित होते. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com