चिरनेर, कलंबुसरे जंगलात विविधरंगी पक्ष्यांचा किलबिलाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिरनेर, कलंबुसरे जंगलात विविधरंगी पक्ष्यांचा किलबिलाट
चिरनेर, कलंबुसरे जंगलात विविधरंगी पक्ष्यांचा किलबिलाट

चिरनेर, कलंबुसरे जंगलात विविधरंगी पक्ष्यांचा किलबिलाट

sakal_logo
By
चिरनेरच्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गप्रेमींसाठी पर्वणी उरण, ता. १२ (वार्ताहर) ः थंडीची चाहूल लागताच डोंगररांगांमधील जंगलात विविधरंगी पक्ष्यांची रेलचेल सुरू होते. त्यांच्या किलबिलाटाने मन प्रसन्न होते. सध्या उरण तालुक्‍यातील चिरनेर, कळंबुसरेतील जंगलात हा अनुभव नागरिक घेत आहेत. गुलाबी थंडी, त्‍यात पहाटेच्या वेळी नरजेस पडणाऱ्या विविध रंगी पक्ष्यांमुळे परिसरात निसर्गप्रेमींची गर्दी होत आहे. पक्ष्यांचा मंजूळ आवाजाने पहाटेच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालतो. उरण तालुक्याच्या पूर्व भागात निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरकुशीत चिरनेर, कलंबुसरे गावे वसलेली आहेत. पूर्व भागात विस्‍तीर्ण जंगल पसरले आहे. याठिकाणी विविध पशू-पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. परिसरातील मुबलक नैसर्गिक पाणवठे हे या पक्ष्यांचे आश्रयस्थान झाले आहे. थंडी पडताच स्थलांतरित पक्ष्यांचे थवे खाडीकिनारी दिसू लागतात. त्‍याबरोबरच जंगलांत राहणाऱ्या पक्ष्याचेही मनोहारी दर्शन होते. यात मोर, रानकोंबडे, सुतारपक्षी, कोकीळ, बुलबुल, यलो स्पॅरो, गवळण, सोनकावळे, तितर, धनेश, गरुड, पोपट, दयाळ, घार, घुबड यासारखे विविध जातीचे पक्षी सहज नजरेस पडतात. त्यांचा मंजूळ आवाजाने वातावरणात एक प्रकारचा उत्‍साह जाणवतो. जंगलात आदिवासी समाजाची मोठी वस्ती असूनही या समाजातील तरुणांनी पशू-पक्ष्यांची शिकार न करण्याचा निर्धार केल्याने चिरनेर, कलंबुसरे जंगलात सध्या विविध पशू-पक्ष्यांबरोबरच मोर-लांडोरींची संख्या वाढली आहे. पशू-पक्ष्यांच्या काही सामाजिक संस्‍था कार्यरत असून त्‍यांच्याकडून जंगल परिसरात शिकार न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जंगलांचे संवर्धन केले तर पशू-पक्ष्यांसाठी ती चांगली आश्रयस्थाने ठरतात. पर्यायाने निसर्गाच्या सानिध्यातील विविध पशू-पक्ष्यांना जवळून पाहण्याची संधी आपणास मिळते. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाचा ठेवा जपायला हवा. - सूर्यकांत म्हात्रे, निसर्ग मित्र.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top