एनएनएमटीमध्ये नियम पायदळी

एनएनएमटीमध्ये नियम पायदळी

एनएनएमटीमध्ये नियम पायदळी गर्दी होत असल्‍याने संसर्गाचा धोका वाशी, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन महामंडळाच्या (एनएनएमटी) बसमध्ये राज्य सरकारच्या कोरोना नियमांची पायमल्‍ली होताना दिसते. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशांची वाहतूक करण्यात येते असून अनेकजण विनामास्‍क प्रवास करताना कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून कठोर नियम लागू केले आहेत. नुकतीच याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहनांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते; येथे मास्क किंवा सॅनिटायझर वापरण्याकडे बहुतांश प्रवासी दुर्लक्ष करतात, हे चित्र धोकादायक आहे. राज्य सरकारने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. मात्र एनएमएमटीच्या अनेक मार्गावरील बसमध्ये गर्दी होत असून प्रवासी दाटीवाटीत उभे असलेले दिसतात. प्रवासी बसमध्ये चढताना मास्‍क लावतात, मात्र चढल्‍यावर तो काढून ठेवतात अथवा हनुवटीला असतो. त्‍यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. याशिवाय कारवाईसाठी विशेष पथके तैनात असून त्‍यांच्याकडून दंडात्‍मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी काही नागरिक जाणूनबुजून मास्‍क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्‍याचे दिसते. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये जेव्हापासून निर्बंध लागू केले आहे, तेव्हापासून प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. पंधरा हजारांनी प्रवाशांची संख्या घटली आहे. तसेच उत्पन्नात देखील घट झाली असून तीन ते चार लाखांनी उत्पन्न घटले आहे. दोन डोस घेतलेल्‍या प्रवाशांनाच वाहनांमध्ये परवानगी देण्यात येत आहे. तसेच मास्क वापरणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवाशांना बसमध्ये चढूच दिले जात नाही. - योगेश कडुसकर, परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी राज्य सरकारच्या नियमावलीतील सूचना - लशींचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा - सार्वजनिक वाहनात केवळ बसून प्रवास करण्यास मुभा - बसमधील प्रवाशांना मास्कचा वापर अनिवार्य प्रमाणपत्र बाळगणे आवश्‍यक एनएनएटीमध्ये सर्व प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेतले आहेत किंवा नाही, हे तपासणे अशक्य आहे. त्यामुळे कंडक्टर आवश्यकतेनुसार प्रवाशांकडे डोस घेतलेल्‍या प्रमाणपत्राची मागणी करतात. ते नसलेल्या प्रवाशांना बसमधून खाली उतरवले जाईल, अशी माहिती परिवहनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com