उत्तनचे विद्यार्थी परिक्षा केंद्राच्या प्रतिक्षेत

उत्तनचे विद्यार्थी परिक्षा केंद्राच्या प्रतिक्षेत

Published on
उत्तनचे विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या प्रतीक्षेत भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : भाईंदर पश्चिमपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उत्तनमधील दहावीचे शेकडो विद्यार्थी स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्यासाठी सध्या भाईंदर पश्चिम येथील परीक्षा केंद्रावर यावे लागते. त्यामुळे उत्तनमध्येच स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. उत्तनमध्ये सेंट जोसेफ, रॉयल स्कूल, आमचे घर आदी पाच मोठ्या शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थी दरवर्षी दहावीच्या परीक्षेला बसत असतात; मात्र या विद्यार्थ्यांसाठी उत्तनमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यासाठी भाईंदरमधील केंद्रांवर यावे लागते. भाईंदरपासून उत्तनचे अंतर सुमारे नऊ किलोमीटर इतके आहे. भाईंदरमधील परीक्षा केंद्रावर येण्यासाठी विद्यार्थ्यांना परिवहन सेवेची बस पकडावी लागते; मात्र बस वेळेवर आली नाही तर त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागतो. केंद्र लांब असल्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे पालकही त्यांच्यासोबत परीक्षा केंद्रांपर्यंत येत असतात. यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. त्यामुळे उत्तनसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची स्थानिकांची मागणी आहे. उत्तनमधील सेंट जोसेफ अथवा अन्य एका मोठ्या शाळेत दहावी परीक्षा केंद्र मंजूर झाले तर विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय टळणार आहे. उत्तनमध्येच केंद्र मिळाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे, असे विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे. --- उत्तनमधील विद्यार्थ्यांसाठी उत्तनमध्ये परीक्षा केंद्र मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळाकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे; मात्र अद्याप या पत्रांची दखल घेण्यात आलेली नाही. - शर्मिला गंडोळी, स्थानिक नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com