मुंबईत साडेचार हजार कोरोना रुग्ण वाढले

मुंबईत साडेचार हजार कोरोना रुग्ण वाढले

मुंबईत साडेचार हजार कोरोना रुग्ण वाढले दिवसभरात १६,४२० रुग्णांची नोंद सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : मुंबईत आज मंगळवारच्या तुलनेत चार हजार ७७३ कोरोनाबाधित वाढले. आज दिवसभरात १६ हजार ४२० रुग्णांची नोंद झाली. काल ११,६४७ रुग्ण आढळले होते. आजची सक्रिय रुग्णांची संख्या १,०२,२८२ एवढी आहे. आज सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ८५४९ रुग्ण आढळले. काल ६६३० रुग्णांची नोंद झाली होती. ठाणे जिल्ह्यात आज आठ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ९,५६,२८७ वर गेली आहे. आज दिवसभरात १४,६४९ रुग्ण बरे झाले. दिवसभरात ६७,३३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या घटली असून ती सध्या ५६ आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी ९८ जणांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २७४६ रुग्णांवर ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत ९,५६,२८७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी १८.८ टक्के भरल्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेट वाढण्याची शक्यता नवीन गाईडलाईननुसार केवळ लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्याच चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे आता लक्षणे नाहीत अशा व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या काहीशी घटण्याची किंवा नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र, लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या केल्याने बहुतांश जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असल्याने पॉझिटिव्हिटी रेट वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com