धारावीत जिजाऊंची जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत जिजाऊंची जयंती साजरी
धारावीत जिजाऊंची जयंती साजरी

धारावीत जिजाऊंची जयंती साजरी

sakal_logo
By
धारावीत जिजाऊंची जयंती साजरी धारावी, ता. १३ (बातमीदार) : धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत व वुमन वेल्फेअर फोरम यांच्यातर्फे काल (ता. १२) सायंकाळी ७.०० वाजता श्रीगणेश विद्यामंदिर हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांचा इतिहास, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण, जिजाऊंचा संघर्ष व आदर्श सामाजिक कार्यकर्त्यांना समजावा याकरिता इतिहास अध्यापक प्रमोद शिंदे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी देशाला आज जिजाऊंची गरज असल्याचे सांगितले. यावेळी वुमन वेल्फेअर फोरमच्या वंदना गाडेकर, राजमाता वेल्फेअर संस्थेच्या अनिता गुजर, धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायतच्या अलका साबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर, साधना शिंदे, सुरेखा शिंदे, शंकर पोटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top