property tax
property taxsakal media

उल्हासनगर : ६५ हजार करबुडव्यांना वॉरंट; मालमत्ता जप्त करण्याचा इशारा

उल्हासनगर : महापालिकेच्या (Ulhasnagar municipal corporation) मालमत्ता कर विभागाने (property tax department) वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून तब्बल ६५ हजार करबुडव्यांना नोटीस दिल्या आहेत. यामध्ये २० हजारवरील थकीत कर असणाऱ्यांना मालमत्ता धारकांचा समावेश आहे. नोटीस (notice) मिळाल्यानंतर २१ दिवसांत कर भरला नाही तर मालमत्ता जप्त करण्याचा इशारा नोटिशीद्वारे मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिला आहे. (Property tax notice issues to property holder in ulhasnagar who have not paid tax)

property tax
तिसऱ्या लाटेचा धोका कायम; राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला

यावर्षी मार्च अखेरपर्यंत विक्रमी वसुलीच्या उद्देशाने पालिकेने कंबर कसली आहे. मालमत्ताधारकांसाठी अभय योजना लागू करण्यात येईल अशी चर्चा होती; मात्र अशी योजना राबवण्यात येणार नसून मालमत्ताधारकांनी आपला थकीत कर ताबडतोब भरावा, कोणालाही करामधून सूट देण्यात येणार नाही, अशी माहिती प्रियांका राजपूत यांनी दिली आहे. कर विभागाची उल्हासनगरकरांवर ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात चालू वर्षाची १२० कोटींची मागणी असून १८० कोटी जुनी थकबाकी आहे.

त्यामध्ये ३०० कोटी रुपयांचा दंड आहे; तर जवळपास ५० हजार करबुडव्यांवर १५० ते २०० कोटींची थकबाकी आहे. सील ठोकताच थकबाकी भरली सात लाखाची थकबाकी असलेले माजी महापौर विद्या निर्मळे यांचे पती विजय निर्मळे यांच्या नावावर असलेली व्यावसायिक मालमत्ता, १६ लाखांची थकबाकी असलेला बाबा प्राइम हा लग्नाचा हॉल, ११ लाखाची थकबाकी असलेला डॉल्फिन हॉटेलवरील इंड्स कंपनीचा टॉवर सील केला होता.

त्यांनी थकबाकी भरताच त्यांना ठोकलेले सील उघडण्यात आले आहे. ४७ कोटींची वसुली उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी मार्च अखेरपर्यंत १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष केंद्रित केले आहे. बुधवार (ता. १२) पर्यंत ४७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. अद्यापही वसुलीला अडीच महिने असून ज्या पद्धतीने ६५ हजार करबुडव्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मालमत्ता जप्तीचा इशारा देण्यात आला आहे. ते पाहता १०० कोटी वसुलीचे लक्ष पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com