मुंबईत नव्या बाधितांसह
सक्रिय रुग्णांमध्ये घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईत काल बुधवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत दोन हजार ७१८ ने घट झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत १३ हजार ७०२ रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख दोन हजार २८२ वरून ९५ हजार १२३ पर्यंत कमी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २० हजार ८४९ रुग्ण बरे झाले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ११ हजार ५१० (८४ टक्के) रुग्ण लक्षणविरहित आहेत. नव्या रुग्णांपैकी केवळ ८७१ रुग्णांना (६.३५ टक्के) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर वाढून ८८ टक्क्यांपर्यंत गेलाआहे. कोरोना रुग्णवाढीचा दर वाढून १.८५ टक्के झाला आहे; तर रुग्णदुपटीचा कालावधीही ३६ दिवसांवर आला आहे.