हत्तेपुर्वी अश्विनी गोरे बिद्रे, अभय कुरुंदकरची ठाण्यात टी पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्तेपुर्वी अश्विनी गोरे बिद्रे, अभय कुरुंदकरची ठाण्यात टी पार्टी
हत्तेपुर्वी अश्विनी गोरे बिद्रे, अभय कुरुंदकरची ठाण्यात टी पार्टी

हत्तेपुर्वी अश्विनी गोरे बिद्रे, अभय कुरुंदकरची ठाण्यात टी पार्टी

sakal_logo
By
हत्येपूर्वी अश्विनी बिद्रे, अभय कुरुंदकर यांची टी-पार्टी एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी लोकेशनवर केले शिक्कामोर्तब नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांची हत्या होण्यापूर्वी काही तास अगोदर त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात भेटल्या होत्या. यानंतर सायंकाळी दोघांनी ठाणे रेल्वेस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला होता. त्यानंतर एकाच कारमधून ते दोघे मिरा रोड येथे गेले होते, असे दोघांकडे असलेल्या एमटीएनएलच्या मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट झाले आहे. एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्यांनी आज पनवेल न्यायालयात ठाणे शहरापासून मिरा रोडपर्यंतच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पनवेल न्यायालयाच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात शुक्रवारी एमटीएनएलचे निवृत्त नोडल अधिकारी धोत्रे यांनी आपली साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी धोत्रे यांची सरतपासणी घेतली. कोरोनाच्या नवीन नियमावलीनुसार न्यायालयाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालले. त्यामुळे धोत्रे यांची उलटतपासणी झाली नसून ती पुढील तारखेला आरोपीचे वकील विशाल भानुशाली हे घेणार आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी यांच्यासह अश्विनी बिद्रे याही एमटीएनएलच्या मोबाईलचा वापर करीत होत्या. त्यामुळे आजची साक्ष महत्त्वाची होती. अश्विनी बिद्रे यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री झाली. त्यापूर्वी संध्याकाळी त्या आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे ठाणे शहरात भेटले. त्यांनी ठाणे रेल्वेस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये चहा घेतला. त्यानंतर दोघेही चारचाकी गाडीमधून मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट परिसरातील कुरुंदकरच्या घरी गेले. दोघांचे मोबाईल जीपीआरएस ठाणे रेल्वेस्थानकापासून ते कुरुंदकरच्या गोल्डन नेस्ट परिसरातील फ्लॅटपर्यंत एकत्र होते, याची नोडल अधिकारी धोत्रे यांच्या सरतपासणीत निश्चित झाले. यावेळी सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्यासह तपास पथकातील अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. चौकट कुंदन भंडारीचे लोकेशनही सापडले अश्विनी यांची हत्या झाली, त्याच दिवशी या हत्याकांडातील आरोपी कुंदन भंडारी हा मध्यरात्री मिरा रोड येथे आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती. हे एमटीएनएलच्या मोबाईलवरून उघड झाले आहे. धोत्रे यांच्या साक्षीमुळे भंडारी याच्या गोल्डन नेस्ट आणि वसई खाडी पुलावरील लोकेशनची खात्री झाली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top