जनतेच्या सेवेत लपवा छपवी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेच्या सेवेत लपवा छपवी नाही
जनतेच्या सेवेत लपवा छपवी नाही

जनतेच्या सेवेत लपवा छपवी नाही

sakal_logo
By
जनतेच्या सेवेत लपवाछपवी नाही! मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता.१४ : ‘कौतुकासाठी नाही; तर कर्तव्य म्हणून काम करतो. जनतेच्या सेवेसाठी काम करताना महापालिका लपवाछपवी करत नाही. काही लोकं स्वत: काही न करता महापालिका काय करते, असा प्रश्‍न विचारतात. नुसते प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. महापालिकेच्या व्हॉट्सॲप सुविधेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘तिळगूळ दिल्याशिवाय शासकीय, प्रशासकीय कामे होत नाहीत, असा गैरसमज आहे. हा गैर समज दूर करणारा हा कार्यक्रम आहे. या सेवेद्वारे ८० सुविधा घरबसल्या मिळणार आहेत. हे वर्क फ्रॉम होम सारखेच आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे.’ मुख्यमंत्र्यांनी या वेळी नाव न घेता भाजपला चिमटे काढले. काही लोकं स्वत: काही कामे करत नाहीत; पण महापालिका काय करते, असा प्रश्‍न विचारतात. जनतेची कामे करून दाखवायला अक्कल लागते, फक्त प्रश्‍नच विचारायचे असतील तर अक्कल लागत नाही, असे ते म्हणाले. ‘व्हॉट्सॲपचा उपयोग आणि दुरुपयोग यातील फरक जाणून घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारा आहे. कोणी कौतुक करावं म्हणून आपण काम करत नाही. चांगल्या कामांची दखल घेतली जात नाही; परंतु थोडी चूक झाली की, महापालिकेला टार्गेट केले जाते; परंतु महापालिका नेमकं काय काम करते? हे आता सर्वांना कळणार आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात झालेल्या कामाचे कौतुक सर्वच स्तरांवर झाले आहे. आपल्या घरच्यांनीच नाही; तर देश, विदेशात व न्यायालयानेही आपले कौतुक केले आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनीदेखील महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाबासकी दिली. म्हणून मी लोकप्रिय! लोकप्रिय मुख्यमंत्री ही केवळ मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता असत नाही; तर ते पूर्ण टीमचे काम असते. माझे सरकार आणि महापालिकेतील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पालिकेला कोणत्याही कामासाठी राज्य सरकारच्या सहकार्याची गरज असेल तर ते नक्कीच केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top