सेन्सेक्समध्ये
१२ अंशांची घसरण
मुंबई, ता. १४ : जागतिक परिस्थिती सामान्य असल्याने आज भारतीय शेअरबाजारांनाही फारशी चमक दाखविता आली नाही. आज सेन्सेक्स १२.२७ अंश; तर निफ्टी २.०५ अंशांनी घसरला.
अमेरिकेतील बेकारांची संख्या वाढल्याची आकडेवारी आल्याने आज आशियाई शेअरबाजारही घसरण दाखवीत होते. त्याचेच अनुकरण आज भारतीय बाजारांनी केले व दिवसअखेर किंचितशी घसरण होत सेन्सेक्स ६१,२२३.०३ अंशांवर; तर निफ्टी १८,२५५.७५ अंशांवर स्थिरावला. आज आयटी क्षेत्राचे बहुतांश शेअर वाढले.
आज टीसीएस (बंद भाव ३,९६९ रु.), इन्फोसिस (१,९२८), लार्सन अँड टुब्रो (२,०४४), टेक महिंद्र (१,७३९), एचसीएल टेक या आयटी शेअरबरोबरच एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती यांचे शेअर वाढले; तर एशियन पेंट्स, अॅक्सीस बँक, हिंदुस्थान युनिलीव्हर, महिंद्र आणि महिंद्र, विप्रो, एचडीएफसी, एअरटेल हे शेअर दीड ते अडीच टक्का घसरले. नेस्ले, टायटन, डॉ. रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक या शेअरचे भावही एक टक्क्याच्या आसपास कमी झाले.