रविवारी, तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक | Mumbai railway update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway megablock
रविवारी, तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी, तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी (ता. १६) मेगाब्लॉक (Mega block on sunday) घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान फ्लॅट क्रमांक ८ वरून विशेष सेवा चालवण्यात येणार आहे. (Mega block on Sunday at central, harbour and western railway)

हेही वाचा: आंध्र प्रदेश : 'या' पक्षाच्या बड्या नेत्याच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कुठे : हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी ९.५३ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत परिणाम : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/ पनवेल अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक कालावधीदरम्यान रद्द केल्या जातील.

कुठे : पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम : पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील; तर काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newsrailway
loading image
go to top