माहीम कोरोना हॉटस्पॉट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहीम कोरोना हॉटस्पॉट
माहीम कोरोना हॉटस्पॉट

माहीम कोरोना हॉटस्पॉट

sakal_logo
By
माहीम कोरोना हॉटस्पॉट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : धारावी, दादर आणि माहीम परिसराचा समावेश असलेल्या जी उत्तर विभागातील रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये हॉटस्पॉट बनलेल्या धारावी आणि दादरपेक्षा माहीम परिसरात अधिक बाधितांची नोंद झाली आहे. माऊंट मेरीची जत्रा, मखदूम शाह बाबांचा उरूस, नाताळ आणि थर्टी फर्स्टसारख्या उत्सवांमुळे माहीममध्ये रुग्णसंख्या वाढली असल्याचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. मुंबईत २१ डिसेंबर २०२१ पासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. २१ डिसेंबर रोजी जी उत्तर विभागात एकूण सात रुग्णांची भर पडली. त्यात धारावी एक आणि दादर व माहीममधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश होता. त्यावेळी धारावीत ७१७९, दादरमध्ये १०,५०७ आणि माहीममध्ये १०,८२९ इतकी रुग्णसंख्या होती. त्यानंतर मात्र रुग्णवाढीचा आलेख वाढतच राहिला. २ जानेवारी रोजी जी उत्तर विभागात पाहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांचा आकडा २७४ वर पोचला. त्यात धारावी ६०, दादर १०२ आणि माहीम ११२ रुग्णांचा समावेश होता. तिसऱ्या लाटेत अगदी सुरुवातीपासून धारावी आणि दादरपेक्षा माहीममधील दैनंदिन रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. गुरुवारी जी उत्तरमध्ये सर्वाधिक ३२९ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक १४७ रुग्ण माहीममध्ये होते. धारावीत ४९ आणि दादरमध्ये १३३ रुग्ण नोंदवले गेले. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी माहीममध्ये धारावी आणि दादरपेक्षा जास्त रुग्ण आढळले. शुक्रवारी जी उत्तरमध्ये सर्वाधिक २४२ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक ११५ रुग्ण माहीममध्ये होते. धारावीत ३२ आणि दादरमध्ये ९५ रुग्ण नोंदवले गेले. आज जी उत्तर मध्ये २८६ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक माहीम १२६, धारावी ४० तर दादरमध्ये १२० रुग्णांची भर पडली. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी माहीममध्ये धारावी आणि दादरपेक्षा जास्त रुग्ण आढळले. गेल्या २५ दिवसांत माहीममध्ये ३,०४०, धारावीत १,२०५ आणि दादरमध्ये २,४७० रुग्णांची नोंद झाली. ... सर्वधर्मीय उत्सव माहीम परिसरात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे त्यांवर बंदी होती. त्यामुळे रुग्णवाढ नियंत्रणात होती. यंदा मात्र लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्याने सर्वधर्मीय उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. यंदा माऊंट मेरी जत्रेनिमित्त गर्दी झाली होती. त्याचबरोबर मखदूम शाह बाबांचा उरूस भरल्याने गर्दी झाली होती. त्याशिवाय नाताळ आणि थर्टी फर्स्टही जोरात साजरा केला गेला. त्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सामाजिक अंतरही बऱ्याच ठिकाणी पाळले गेले नाही. परिणामी उत्सव संपल्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. ........... जानेवारीतील सात दिवसांतील स्थिती तारीख माहीम धारावी दादर १५ १२६ ४० १२० १४ ११५ ३२ ९५ १३ १४७ १३३ ४९ १२ १६५ ६९ १५८ ११ १२६ ५१ १३३ १० २२९ ९७ १३६ ९ २३५ १२३ १९० ... विविध उत्सवांमुळे माहीममध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. परिणामी धारावी आणि दादरच्या तुलनेत माहीममध्ये रुग्णवाढ जास्त असल्याचे दिसते. रुग्णवाढ अधिक असलेल्या ठिकाणी आम्ही फिवर ओपीडी सुरू केल्या असून चाचण्या वाढवल्या आहेत. बाधितांची व्यवस्था जम्बो कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त ... एकूण रुग्णसंख्या माहीम - १३,८६९ धारावी- ८,३८४ दादर - १२,९७७ एकूण - ३५,२३० ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top