''ओल्ड इज गोल्ड'' टॅटू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ओल्ड इज गोल्ड'' टॅटू
''ओल्ड इज गोल्ड'' टॅटू

''ओल्ड इज गोल्ड'' टॅटू

sakal_logo
By
''ओल्ड इज गोल्ड'' टॅटू हौशी युवकांमध्ये क्रेझ वाढतेय वाशी, ता. १५ (बातमीदार) : ''ओल्ड इज गोल्ड'' ही म्हण तरुणांमध्ये सध्या फारच रूजत आहे. आजकाल टॅटू म्हणजेच गोंदण शरीरावर रेखाटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. युवकांमध्ये ही टॅटूची क्रेझ वाढत आहे. मात्र, कोरोनाची भीती कायम असल्याने टॅटू व्यावसायिक आम्ही सर्वतोपरी काळजी घेतोय अशा प्रतिक्रिया एकसूरात काढत आहेत. पूर्वी नवी मुंबईतील गावांमध्ये होणाऱ्या यात्रांमध्ये गोंदण काढले जायचे. प्रचंड प्रमाणात त्रास सहन करून गोंदवायचे; परंतु तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने गोंदण रेखाटणे सोपे झाले आहे. काही त्रासही सहन करायची गरज नाही. मागील पावणे दोन वर्षांत कोरोनाचा मोठा परिणाम शहरातील टॅटू व्यवसायावर झाला आहे. कोरोनाचा फटका या व्यवसायाला प्रचंड प्रमाणात बसला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता टॅटूचे हौशी मंडळी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरी देखील काही मंडळींकडून टॅटूची हौस भागवण्यात येत आहे. युवकांमध्ये तर टॅटू काढण्याकडे क्रेझ अधिक आहे. २१ ते ३५ वयोगटातील तरुणांचा टॅटू काढण्याचा कल अधिक आहे. त्यातच नवदाम्पत्यांकडून टॅटू अधिक काढण्यात येत आहे. लग्न झाल्यानंतर मुलांच्या नावांचे टॅटूही काढण्याकडे कल अधिक आहे. ---------------------------- कलाकारांची रोजीरोटी टॅटू प्रामुख्याने कलेचा भाग आहे. या व्यवसायावर शहरातील अनेक कलाकारांची रोजीरोटी अवलंबून आहे. आधीच कोरोनामुळे या व्यवसायावर संकट आले आहे. प्रशासनाने पुन्हा कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करू नये. शिवाय आम्ही स्वत:च कोरोना प्रतिबंध या संबंधीची काळजी घेतोय, अशी प्रतिक्रिया टॅटू व्यावसायिक व्यक्त करत आहेत. हवी ती डिझाईन टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला पैसे द्यावे लागतात. ५०० रुपयांपासून ते २ हजार रुपये घेण्यात येतात. टॅटू त्वचेच्या सात लेअरपैकी तीन लेअर मशीनने कट करून काढले जातात. हवी ती डिझाईन आणि आपल्याला हवा तो फोटो काढता येऊ शकतो. हात, दंड, मान, मणका या अवयवांवर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. कायमस्वरूपी टॅटूबरोबर तात्पुरते टॅटूही बाजारात मिळतात. हे १५ ते २० दिवस अंगावर राहतात. प्रत्येक वेळी आपल्याला हवा तो टॅटू तात्पुरत्या स्वरूपात काढून घेता येत असल्याने अशा टॅटूना तरुण अधिक पसंती देतात. -------------- टॅटू हौशींना गोंदवताना थेट संबंध येतो; परंतु आम्ही पूर्वीपासूनच हातमोजे आणि मास्क घालत आहोत. त्याचप्रमाणे व्हॅक्सिन घेतलेल्यांनाच टॅटू काढत आहोत. टॅटू काढणाऱ्याला तंदुरुस्त आहे का, याची खातरजमा केल्यानंतरच टॅटू काढतो. - सत्यंद्र लाहारी, टॅटू व्यावसायिक
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top