प्रकरणाची तातडी न सांगितल्यास दंड
उच्च न्यायालयाची वकिलांना ताकीद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई उच्च न्यायालयाने केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. जर वकिलांनी तातडी नसलेल्या प्रकरणांचा उल्लेख केला तर त्यांना दंड सुनावला जाईल, अशी ताकीदही न्यायालयाने दिली आहे.
कोरोना रुग्णवाढीमुळे सध्या उच्च न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने सुनावणी सुरू आहे. याबाबत न्याय प्रशासनाने एक सूचना पत्र जारी केले आहे. अनेकदा वकील आणि पक्षकार तातडीची नसलेल्या प्रकरणांचा उल्लेख करत असतात. यामुळे न्यायालय कर्मचारी आणि विभागांत कामाचा ताण निर्माण होतो. सध्या कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट करण्यात आली आहे, असे यात स्पष्ट केले आहे. अनेकदा वकील आणि पक्षकार तातडीची नसलेली प्रकरणे यादीत नमूद करीत असतात. जर अशी तातडीची नसलेली प्रकरणे नमूद करण्यात आली तर त्यासाठी मोठा दंड आकारण्यात येईल वा मग याचिकेची सुनावणी दीर्घ काळासाठी तहकूब केली जाईल, असा इशारा सूचना पत्रात दिला आहे.
...
सध्या न्यायालयाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने तीन तासांसाठी सुरू आहे. सूचनेचा उद्देश आणि हेतू सर्वांनी समजून घ्यायला हवा. सध्या कर्मचारी संख्या कमी असल्याने मर्यादित वेळ निश्चित केली आहे. यामुळे न्यायालयात गर्दीही कमी होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
...