राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित
राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित

राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित

sakal_logo
By
राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित मुंबईत २४ रुग्ण सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ :  आज राज्यात १२५ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील २४ रुग्णांचा समावेश असून मुंबईतील एकूण रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर ३९, मुंबई २४, मिरा-भाईंदर २०, पुणे मनपा ११, अमरावती ९, अकोला ५, पिंपरी-चिंचवड ३, औरंगाबाद, जालना, पुणे ग्रामीण, अहमदनगर प्रत्येकी २, तर नाशिक, कोल्हापूर, लातूर, सातारा, ठाणे मनपा, वर्धा प्रत्येकी रुग्णांचा समावेश आहे.    आजपर्यंत राज्यात एकूण १७३० ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील २६ रुग्ण हे इतर राज्यांतील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत; तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.    एकूण रुग्णांपैकी ८७९ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४,७९२ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top