दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन; घोषणाबाजीने दुमदुमला परिसर |Navi mumbai international Airport | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Di Ba Patil name for navi mumbai airport
दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन; घोषणाबाजीने दुमदुमला परिसर

दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांचे काम बंद आंदोलन; घोषणाबाजीने दुमदुमला परिसर

पनवेल : सिडकोच्या (cidco) माध्यमातून नवी मुंबईत (Navi mumbai) उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (Di Ba Patil) यांचे नाव देण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या विमानतळ काम बंद आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्‍पग्रस्‍त सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या धसक्यामुळे विमानतळासाठी (Navi mumbai International Airport) सुरू असलेले काम आधीच बंद ठेवण्यात आले होते. जोपर्यंत सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही, तो पर्यंत नामकरणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन (Strike) सुरूच ठेवणार असल्‍याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केला.

Strike

Strike

हेही वाचा: मोरोशी भैरवगडाची कठीण 450 फूट प्रस्तर भिंत 10 तासांत सर

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, याकरिता प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात येत असून कृती समितीने केलेल्या घोषनेनुसार सोमवारी करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनासाठी परिसरातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने विमानतळ परिसरात दाखल झाले होते. सकाळी सुरू झालेल्या आंदोलनप्रसंगी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता; तर आंदोलकांच्या भीतीने सिडकोने रविवारपासूनच विमानतळाचे सुरू असलेले काम बंद ठेवले होते.

आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती व इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. टाळमृदुंगाच्या गजरात आंदोलक सहभागी विमानतळाचे काम बंद आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्यात येईल, अशी अपेक्षा असताना टाळ-मृदंगाच्या गजरात काही प्रकल्‍पग्रसत आंदोलनात सहभागी झाले होते, तर काहींनी पारंपरिक बाल्या नृत्‍य करीत सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा: डोंबिवली: १२ वी पास पवनचा भरायचा दरबार, अंगात सप्तश्रृंगी येत असल्याचा दावा

महिन्याभराची मुदत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि विमानतळाला नाव देण्याबाबत सरकारने एका महिन्यात निर्णय न घेल्यास एक लाख आंदोलक रस्त्यावर उतरतील आणि आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कृती समितीने दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता पुरे झाले. दिबांशिवाय कोण उरले, विमानतळाला दुसरे नाव शक्‍यच नाही, अशा स्‍वरूपातील घोषणा यावेळी देण्यात आल्‍या.

भाषणबाजीमुळे आंदोलक नाराज आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्‍तांच्या नेत्यांनी केलेल्या लांबलचक भाषणांमुळे काही आंदोलक नाराज झाले होते. भाषणबाजी कमी करा आणि ठोस भूमिका घ्या, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी ११९ पोलिस अधिकारी, ९०७ अंमलदार, एक एसआरपी बिट विमानतळ परिसरात तैनात करण्यात आले होते. आंदोलनात पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास अडीच हजारांहून अधिक आंदोलक सामील झाल्याचा अंदाज पोलिस विभागाच्या गोपनीय कक्षाकडून वर्तवण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi MumbaiAirportStrike
go to top