
नगरसेवकांची आयडीयाची कल्पना; धारावीतील नगरसेवकांकडून निधीची उधळपट्टी
मुंबई : मतदारांना दिलेली आश्वासने पाळण्यासाठी दादरच्या नगरसेवकांनी (corporator) अनोखी कल्पना लढवली आहे. नगरसेवक निधीतून (corporate fund) खासगी इमारत परिसरात विकासकामे, सीसीटीव्ही (cctv) लावता येत नाहीत, पण इमारतीच्या बाहेरील परिसरात हे कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. धारावीतील मक्कुनी थावलापील, मरीअम्मल थेवर हे शिवसेनेचे (shivsena) आणि रेश्माबानो खान या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) नगरसेविकेने ही कल्पना लढवली आहे. ‘या परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही स्थानिकांकडून मागणी होत होती.
हेही वाचा: पालघर : भादवे येथे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
त्यामुळे नगरसेवक निधीतून हे सीसीटीव्ही लावण्यात येतील, असे थेवर यांनी सांगितले. महानगरपालिकेने धारावीत सीसीटीव्ही लावण्यासाठी चार निविदा मागवल्या आहेत; तर या परिसरात उघड्यावर कचरा टाकला जात होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा उपाय केला जात आहे, असे पालिकेच्या जी उत्तर प्रभागातून सांगण्यात आले. चौकट नगरसेवक निधीतून पिशव्या आणि साड्याही यापूर्वी पालिकेने नगरसेवक निधीतून मतदारांना देण्यासाठी तागाच्या, कापडांच्या पिशव्या, विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केले आहेत.
त्याचबरोबर गरजू महिलांना साड्या देण्यासाठीही नगरसेविका निधी राखून ठेवला आहे. कुर्ला परिसरातील नगरसेवकांनी ही योजना आणली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजू महिलांना शिलाई मशीन देण्यासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. धारावी येथे लागणार सीसीटीव्ही मदिना नगर, सेठवाडी, अण्णा नगर, धोबीघाट ब्रिज, कुंभारवाडा पहिला आणि चौथा, नेताजी सोसायटी, सूर्योदय सोसायटी, राजीव इंदिरा चाळ, पीव्ही चाळ, थेवर अपार्टमेंट
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..