Nanded News : माहूरमध्ये ‘राष्ट्रवादी’चे पुन्हा वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nationalist Congress Party
माहूरमध्ये ‘राष्ट्रवादी’चे पुन्हा वर्चस्व

माहूरमध्ये ‘राष्ट्रवादी’चे पुन्हा वर्चस्व

माहूर : माहूर नगरपंचायतसाठी (Mahur Nagar Panchayat)दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी (ता.१९) पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय (Nagar Panchayat Election Result)अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात चार टेबलवर पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ६, शिवसेना ३ तर भाजपाला एक जागेवर विजय मिळाला आहे.

हेही वाचा: नांदेडात पार्किंग व्यवस्थेची ‘ऐशी तैशी’!

तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या मतमोजणीचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी घोषित केले असून त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी काम पाहिले. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.प्रभाग क्रमांक पाच (अनुसूचित जमाती महिला) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सारिका देवीदास सिडाम या १५३ इतके मतदान घेऊन निवडून आल्या आहेत.

हेही वाचा: नांदेड : सव्वातीन हजारांपैकी ६६ बाधितांवर रुग्णालयात उपचार

या ठिकाणी अपक्ष उमेदवार आम्रपाली संतोष दांडेकर यांनी बॅलेट युनिट नंबरमध्ये तफावत आल्याचा आरोप करत हे या प्रभागाची दुबार मतमोजणी करण्याची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला आहे. तर या प्रभागाच्या फेर मतमोजणीसाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार श्रीमती दांडेकर यांनी दिली आहे. माहूर नगरपंचायत मधील १७ जागांवर प्रभाग व पक्ष निहाय निवडून आलेले उमेदवार यात भंडारे विलास बाजीराव (काँग्रेस), जाधव आशाबाई निरधारी (शिवसेना), कांबळे नंदा रमेश (काँग्रेस), कामटकर विजय शामराव (शिवसेना), सारिका देवीदास सिडाम (राष्ट्रवादी काँग्रेस), सौदागर मसरत फातेमा (राष्ट्रवादी काँग्रेस), केशवे राजेंद्र नामदेवराव (काँग्रेस), सौंदलकर कविता राजू (काँग्रेस), सय्यद शकीलाबी शब्बीर (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख लतीफा मस्तान (काँग्रेस), लाड ज्ञानेश्वर नारायण (शिवसेना), राठोड सागर विक्रम (काँग्रेस), महामुने सागर सुधीर (भाजपा), शेख बिल्किस अहमद आली (राष्ट्रवादी काँग्रेस ) दोसानी फिरोज कादर (राष्ट्रवादी काँग्रेस), खडसे अशोक कचरु (राष्ट्रवादी काँग्रेस), पाटील शीला रणधीर (राष्ट्रवादी काँग्रेस).

Web Title: Dominance Of Nationalist Congress Party In Mahur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :electionDominance