
मुलांचे अश्लिल व्हिडीओ प्रसारीत करण्यावर गुन्हा; आरोपीचा शोध सुरू
नवी मुंबई : सोशल मीडियावर (Social media) लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ (Abusive video) प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या (Navi mumbai police) सायबर सेलने (cyber cell) सीबीडी पोलिस ठाण्यात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. दत्ता बळिराम पडवळ असे त्याचे नाव असून ऑगस्ट २०२० मध्ये त्याने समाजमाध्यमांवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले होते.
हेही वाचा: रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा कायापालट होणार; विकासासाठी ४० कोटींचा निधी
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाने शोध घेतला सीबीडीतील आग्रोळी भागात राहणाऱ्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे आढळले. याबाबतची माहिती महाराष्ट्र सायबर सेलने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला दिल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने माहिती घेत ही व्यक्ती दत्ता बळिराम पडवळ असल्याचे आढळले. त्यामुळे सायबर सेलने दत्ता पडवळ याच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..