नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका मार्चमध्ये लागण्याची शक्यता
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली होती.
वाशी - दीड वर्षापासून कोरोनामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Navi Mumbai Municipal Election) लांबणीवर गेल्या आहे. कोरोना रुग्णांसह (Corona Patients) ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patients) संख्या आटोक्यात आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये (February) होणार असल्याचे घोषित केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका देखील झाल्या आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेचा कालावधी संपत असल्यामुळे मुंबईसह नवी मुंबई महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली होती. आरक्षण सोडतीसह मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला व निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. जवळपास दीड वर्षांपेक्षा अधिक काळ पालिकेवर प्रशासकीय म्हणून आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता होती.
मात्र, फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली व रुग्ण संख्या वाढू लागली. ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली होती. त्याच वेळी राज्य सरकारने मंत्रीमंडळामध्ये बहुसदस्य पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसंख्या वाढल्यामुळे राज्य सरकारने प्रभागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पालिकेच्या १११ सदस्यांऐवजी १२२ नगरसेवकांच्या जागा महापालिकेच्या वाट्याला आल्या आहे. तर पालिकेला निवडणूक आयोगाने सुधारित प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यास सांगितले. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेला कच्चा आराखडा देखील सादर केला आहे.
मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आल्यानंतर ५ जानेवारी रोजी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुका देखील घोषित केल्या आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात असून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. मुंबई महापालिकेचा कालावधी फेब्रुवारीमध्ये संपत असल्यामुळे मुंबईसह नवी मुंबई महापालिकेच्या देखील निवडणुका लागणार असल्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.