Tue, May 17, 2022

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
Published on : 31 January 2022, 12:09 pm
कार्यालयीन कामकाजात मराठी भाषाच हवी
महापालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : कार्यालयीन कामकाजात मराठी भाषाच वापरली पाहिजे. तेव्हाच भाषेचा विकास आणि अधिकाधिक प्रसार होण्यास मदत होईल, असे मत महापालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांनी व्यक्त केले. भाषेवर भर देत असताना कार्यालयीन आचारसंहितेचे महत्त्वही अभय जाधव यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना पटवून दिले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित कार्यक्रमात जाधव यांनी संवाद साधला. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारीवृंद यांच्या सहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्यांजली शिर्षकांतर्गत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदानी आपल्या आवडत्या मराठी कवीच्या दर्जेदार कवितांचे वाचन केले. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, अरविंद उरसळ, सुरेखा वाडे, पुष्पांजली कर्वे, प्रकाश बागडे, वसंत निमसे, नयना महाजन, वनश्री चव्हाण, सुजाता औटी, देवेंद्र भगत, प्रतीक्षा कोरडे, प्रीती जाधव, शर्मिली दिघे, प्रतीक्षा पाटील, अपर्णा सुतार, पुरुषोत्तम घरत, दुर्गा लगसकर, गजानन चव्हाण व संदीप फुलारी यांनी मराठीतील नामांकित कवींच्या कवितांचे सादरीकरण करून काव्यमय वातावरण निर्मिती केली. या निमित्ताने अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून काव्य निवडण्यासाठी विविध कवितांच्या पुस्तकांचे वाचन झाले.
साहित्यावर विवेचन
महापालिकेचे विधी अधिकारी अभय जाधव यांनी कायदा, साहित्य आणि कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर यावर अभ्यासपूर्ण संवाद साधला. १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून कायदा हा शब्द अस्तित्वात आल्याचे सांगत त्यांनी कायदेविषयक विविध बाबींवर माहिती दिली. कायद्याशी संबंधित पुस्तके तसेच विधिज्ञांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील साहित्यावर त्यांनी विवेचन केले.
फोटो घ्यावा.
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..