नवी मुंबई : ऐन थंडीत राजकारण तापणार; प्रारूप प्रभाग रचना उघडणार
नवी मुंबई : कोविडमुळे (corona) गेले दोन वर्षे लांबणीवर पडलेली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक (Navi mumbai municipal election) अखेर एप्रिल महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, १ फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचनांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात (supreme court) ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरू असल्यामुळे प्रभागांचा ड्रॉ काढण्यास महापालिकेच्या निवडणूक विभागाला काहीसा वेळ घ्यावा लागणार आहे.
यंदा नवी मुंबई महापालिकेची १११ जागांऐवजी १२२ जागांवर निवडणूक होणार आहे. गेल्या २५ वर्षांच्या निर्विवाद सत्तेला या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकीची मोट बांधली आहे. त्याला काहीशी मदत प्रभाग रचनेतूनही होणार आहे. राजकीय सत्तेचा प्रभाव वापरून प्रभागातील हद्दींची अदलाबदल करण्याचा शह-काटशहाचे राजकारण सर्वच पक्ष करतात. यावेळेस या संधीचे महाविकास आघाडीने वापर केल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. पूर्वी ज्या दिवशी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्या जात असे, त्याच दिवशी प्रभागांचा ड्रॉ ही काढला जात होता. परंतु सध्या सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारला बाजू मांडण्याची वेळ दिली आहे. केंद्र सरकारतर्फे युक्तिवाद आणि माहिती सादर करेपर्यंत ड्रॉ काढण्यास महापालिकेचे निवडणूक विभाग वेळ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला फक्त प्रभागांची प्रारूप रचना जाहीर होणार आहे.
त्यानंतर गेले दोन वर्षे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या प्रस्थापित आणि नवख्या उमेदवारांची प्रतिक्षा पूर्ण होणार आहे. यंदाची निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेवर माजी मंत्री आणि सध्याचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांची २५ वर्षांपेक्षा जास्त निर्विवाद सत्ता आहे. आता ही सत्ता घालवण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आदी मंत्री आणि खासदार रिंगणात उतरणार आहेत. महाविकास आघाडीने विविध मंत्री नवी मुंबईत पाठवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
परंतु भाजपतर्फे अद्यापही केंद्र आणि राज्यातील मोठा चेहरा नाईकांच्या मदतीला आलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत नाईकांना नामोहरम करण्यासाठी विविध क्लृप्त्या विरोधी पक्षांनी वापरल्या आहेत. परंतु शेवटच्या क्षणी नाईकांचा करिष्मा निकालांचा कल बदलून जातो. यंदाची निवडणूक अस्तित्वाविरोधात प्रतिष्ठा अशी असणार आहे. यात प्रभाग रचनांच्या हद्दीचा मोठा वाटा असणार आहे. १२२ जागांवर होणार निवडणूक नवी मुंबई महापालिकेचे पूर्वी ८९ त्यानंतर गेल्या पंचवार्षिकमध्ये १११ नगरसेवक होते. आता बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने नगरसेवकांची संख्या १२२ एवढी झाली आहे. ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार असल्याने तीन नगरसेवकांचा १२१ प्रभाग असणार आहे. तर १२२ वा प्रभाग हा दोन नगरसेवकांचा असणार आहे. असे एकूण ४१ प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.
सत्तेसाठी गोळाबेरीज गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ३८ नगरसेवक तर भाजपचे ६ नगरसेवक होते. तर गणेश नाईक गटातील ५ अपक्ष असे मिळून एकूण ५२ नगरसेवकांची ताकद होती. यात काँग्रेसच्या दहा नगरसेवकांची पाठिंबा देऊन नाईकांना ६२ नगरसेवकांची फौज घेऊन सत्ता स्थापन करता आली. या वेळेस नाईक गटातून १२ समर्थक नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीत गेले आहेत. तर शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचे चार असे एकूण सात नगरसेवक नाईकांसोबत गेले आहेत. प्रभाग रचनांच्या बदललेल्या हद्दींमुळे भौगोलिक रचना काहीशी महाविकास आघाडीला पोषक ठरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आणखी काही धक्के नाईकांच्या साम्राज्याला बसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. १५ दिवसांची प्रक्रीया १ फेब्रुवारीला प्रभागांच्या प्रारूप रचना जाहीर होणार आहे. प्रारूपासोबत सीमा, दिशा आणि नकाशा जाहीर होणार आहे. त्याकरिता हरकती व सूचना मागवल्या जाणार आहे. हरकती सूचना मागण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर सुनावण्यात घेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी एक महिन्यांचे दिवस निघून जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.