पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडीत
पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडीत

पंचायत समितीचा वीज पुरवठा खंडीत

sakal_logo
By
पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित वीजबिल न भरल्याने कारवाई वाडा, ता. ३१ (बातमीदार) ः वाडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या विद्युत मीटरचे वीजबिल गेल्या वर्षभरापासून न भरल्याने महावितरणने आज या कार्यालयातील विद्युत मीटरचा वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे कार्यालय अंधारात गेले असून कामकाज ठप्प झाले आहे. वाडा पंचायत समिती कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग व रोजगार हमी योजना विभागाची कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांना ०१०५१४१७१६६७ या क्रमांकाच्या विद्युत मीटरवरून वीजपुरवठा केला जातो. या विद्युत मीटरचे बिल २२ हजार ५२० रुपये आले असून ते भरण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२२ होती. मात्र मुदतीत वीजबिल न भरल्याने आज महावितरणने या कार्यालयातील विद्युत मीटरचा पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कार्यालय अंधारात गेले असून कामकाज ठप्प पडले आहे. विद्युत बिल आम्ही जिल्हा बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाठवले आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून खर्च आलेला नसल्याने आम्ही वीजबिल भरू शकलो नाही. अंकुश निमजे, उपअभियंता, वाडा पंचायत समिती

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top