मुंबई
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात
रुग्णसंख्या तीन आकड्यांवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठाणे शहरात मागील महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता. त्यात दिवसागणिक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र आता रुग्ण संख्येत घट होत असून मागील महिन्याच्या अखेरीस असलेली चार आकडी रुग्ण संख्या पुन्हा तीन आकड्यांवर आली आहे. मृत्यूचे प्रमाणही आटोक्यात आहे. सध्या शहरात १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत १ ते ३० जानेवारी या कालावधीत ठाणे शहरात ३७ हजार ३९४ नव्या रुग्णांची भर पडल्याचे दिसून आले आहे.
१ जानेवारी रोजी मृतांचा आकडा हा २ हजार १०९ एवढा होता. त्यात महिना अखेरपर्यंत केवळ आठ रुग्णांच्या मृत्यूची वाढ झाली.
जानेवारीच्या पहिल्या दिवशी ८४८ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू होते. सध्या १२६ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरूपात उपचार सुरू आहेत. बाधित रुग्ण चार ते पाच दिवसांत बरे होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवरून पुन्हा ९६ टक्क्यांवर आले आहे. दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अधिक फटका हा ३१ ते ४० या वयोगटाला बसल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल २१ ते ३० या वयोगटातील देखील रुग्ण वाढताना दिसून आले आहेत. लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला नाही.
कोरोनाचे मागील १० दिवसांतील रुग्ण
तारीख रुग्ण संख्या मृत्यू
२१ जानेवारी ८९० १
२२ ६७२ १
२३ ४६१ ०
२४ ३९९ १
२५ ३६७ ०
२६ २९७ ०
२७ २६९ ०
२८ २६४ ०
२९ २५८ ०
३० २४८ ०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.