मुंबई : बेस्टची वाट पाहत असलेल्या 2 प्रवाशांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Accident
चुनाभट्टीत गाडीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मुंबई : बेस्टची वाट पाहत असलेल्या 2 प्रवाशांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

sakal_logo
By

भरधाव गाडीच्या धडकेत चुनाभट्टीत दोघांचा मृत्यू

चेंबूर, ता. ३१ (बातमीदार) : सायन-ठाणे महामार्गावरील एव्हरार्ड नगर बसथांब्याजवळ सोमवारी सकाळी बेस्टची वाट पाहत असलेल्या दोन प्रवाशांना भरधाव गाडीची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सीसी टीव्हीच्या मदतीने तपास करून चुनाभट्टी पोलिसांनी फरारी चालकाला अटक केली आहे. चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगरजवळील बेस्ट बसच्या थांब्यावर सकाळी साडेआठ वाजता झालेल्या अपघातात सायनच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने दोन प्रवाशांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब नाथा काळे (वय ५४) असे एका मृत प्रवासाचे नाव आहे. दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newsaccident
go to top