ऑनलाईन परीक्षेसाठी धारावीत विद्यार्थ्यांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन परीक्षेसाठी धारावीत विद्यार्थ्यांचा मोर्चा
ऑनलाईन परीक्षेसाठी धारावीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

ऑनलाईन परीक्षेसाठी धारावीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

sakal_logo
By
ऑनलाईन परीक्षेसाठी धारावीत विद्यार्थ्यांचा मोर्चा धारावी (बातमीदार) : दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी धारावीतील संत रोहिदास मार्गावरील गोल्ड फिल्ड सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. शालेय शिक्षणमंत्री व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांचे एक निवासस्थान गोल्ड फिल्ड सोसायटीत असल्याने हा मोर्चा इमारतीसमोर धडकला. प्रसिद्ध यू-ट्युबर विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी अचानक अकरा वाजल्यापासून दहावी-बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी जमू लागले. मंत्री गायकवाड धारावीत नसल्याने त्यांची भेट घेणे आंदोलकांना शक्य झाले नाही. तणाव वाढू नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत होते; परंतु विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला. विद्यार्थ्यांना पांगवल्यावर पोलिसांनी शीव स्थानकासमोरील धारावीकडे जाणारा संत रोहिदास मार्ग रोखून बंद केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top