मुंबई
निर्देशांक जोरदार उसळी
निर्देशांकात जोरदार उसळी
सेन्सेक्स तब्बल ८१३ अंशांवर; निफ्टीही तेजीत
मुंबई, ता. ३१ : उद्या सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प व त्यापूर्वी सादर झालेला अनुकूल आर्थिक सर्वेक्षण अहवाल या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअरबाजार निर्देशांकांनी सव्वा टक्क्यांहूनही जास्त उसळी घेतली. सेन्सेक्स ८१३.९४ अंशांनी; तर निफ्टी २३७.९० अंश वाढला. त्यामुळे सेन्सेक्सने पुन्हा ५८ हजारांचा टप्पा गाठला.
आज शेअरबाजारांचे व्यवहार सुरू होतानाच निर्देशांक मोठी वाढ दाखवत उघडले व नंतर ते दिवसभर नफ्यातच राहिले. आयटी, बँका, वाहन उद्योग, धातूनिर्मिती, औषध कंपन्या आदी सर्वांचे शेअर आज नफ्यात होते. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५८,०१४.१७ अंशांवर तर निफ्टी १७,३३९.८५ अंशांवर बंद झाला. निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ४४ शेअर नफा दाखवत बंद झाले, तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० पैकी २७ शेअर वाढ दाखवत बंद झाले.
सेन्सेक्समधील फक्त इंडसइंड बँक ३१ रुपयांनी कमी होऊन ८७१ रुपयांवर, तर कोटक बँक ४० रुपयांनी घटून १,८५७ रुपयांवर आला. हिंदुस्थान युनिलीव्हर आठ रुपयांनी कमी होऊन २,२७४ रुपयांवर आला. त्याखेरीज सेन्सेक्समधील सर्व प्रमुख २७ शेअर कमीअधिक प्रमाणात वाढले. टेक महिंद्र ६८ रुपयांनी (बंद भाव १,४७९ रु.) वाढला, तर विप्रो २० रुपयांनी वाढून ५७२ रुपयांवर गेला. बजाज फिनसर्व्ह ४८९ रुपये (१५,६८९) तर इन्फोसिस ५१ रुपये (१,७३६) वाढला. स्टेट बँक (५३८), डॉ. रेड्डीज लॅब (४,३०४), टायटन (२,३६०), बजाज फायनान्स (७,००२), एअरटेल (७२९), महिंद्र आणि महिंद्र, एचसीएल टेक, अल्ट्राटेक, एचडीएफसी, टीसीएस, सनफार्मा, एल अँड टी, नेस्ले यांचेही भाव वाढले.
शेअरची पुनर्खरेदी
आर्थिक सर्वेक्षण अहवाल चांगला असल्याने उद्याचा अर्थसंकल्पही चांगला असेल या अपेक्षेत गुंतवणूकदारांनी आज शॉर्ट कव्हरिंग (आधी विकलेले शेअर वा सौदे पुन्हा खरेदी) केले. त्यामुळेही आजच्या तेजीत भर पडली. ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या तिमाही महसुलात वाढ झाल्याने त्याच्या शेअरचे भाव आज वाढले; तर मानांकन संस्थांनी अनुकूल अहवाल दिल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचा भावही दोन टक्क्यांनी वाढून २,३८६ रुपयांवर गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.