मुंबई
मुंबई महापौरांचे भाजप नेत्यांवर टीकास्त्र
पक्ष्यांवरून पक्षीय राजकारण
मुंबई महापौरांचा भाजप नेत्यांवर वार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या १७ कोटी रुपयांच्या पेंग्विन कक्षावरून भाजपने सुरू केलेला जोरदार हल्ला परतवून लावण्यास महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुरुवात केली आहे. मुक्या पक्ष्यांवरून भाजपकडून राजकारण केले जात होते, ते पाहवले नाही. म्हणून पूर्ण राजशिष्टाचार पाळून मी गुजरातेत गेले होते. मी काही लपूनछपून गेले नव्हते, अशी टीका त्यांनी केली.
या अटीतटीच्या लढाईत महापौरांनी अहमदाबादेत जाऊन तेथील २६७ कोटी रुपयांच्या पेंग्विन कक्षाचा चोख अभ्यास करून शस्त्रे परजून घेतली. यावरून त्यांनी भाजप राज्यातील नेत्यांवर टीकेचे वार केले. गुजरातेतील पेंग्विन कक्षाला आलेला खर्च आणि मुंबईतील पेंग्विनच्या खर्चाची तुलनात्मक माहितीच त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ठेवली.
त्या म्हणाल्या, की ‘गुजरात सायन्स सिटी’ला भेट दिल्यानंतर पेंग्विन पाहाण्यासाठी प्रत्येकाला तब्बल २०० रुपये मोजावे लागतात. तेथे पेंग्विनच्या देखभालीसाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. पेंग्विन कक्षासाठी तब्बल २६७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे; तर मुंबईत अवघ्या १७ कोटी ५० लाखांत हा कक्ष उभारण्यात आला आहे.
...
ते आणि हे
‘गुजरात सायन्स सिटी’तील कक्षात पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नाही. त्याच वेळी मुंबईतील पेंग्विन कक्षात डॉक्टरांचे वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अनेक वर्षांपूर्वी पेंग्विन आणले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच या देशाला दिशा दाखवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दोन्ही शहरांतील पेंग्विनची माहिती दिल्यानंतर महापौरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
नेत्यांना नावे द्यायची का?
जे चांगलं देता येईल ते आम्ही मुंबईला देतोय. पक्षी-प्राण्यांवरून राजकारण करण्यापेक्षा शिवसेना काम करण्यावर भर देत आहे. पेंग्विनवरून शिवसेनेला टोमणे मारण्यात आले. आता त्या पेंग्विनची नावे भाजपच्या नेत्यांना द्यायची का?
...
किशोरीबेन आपडा
अहमदाबादेतील आदरतिथ्यावर किशोरी पेडणेकर यांनी अहमदाबादचे महापौर अगदीच साधेसरळ असल्याचे म्हटले. मुंबईत भेटीवर येणाऱ्यांचे आदरतिथ्य आम्ही ज्या पद्धतीने करतो. तसेच आमचेही करण्यात आले. ‘जिलेबी, फाफडा किशोरी बेन आपडा’ असे चित्र होते, असे महापौर म्हणाल्या.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.