‘हिंदुस्थानी भाऊ’वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हिंदुस्थानी भाऊ’वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
‘हिंदुस्थानी भाऊ’वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

‘हिंदुस्थानी भाऊ’वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
‘हिंदुस्थानी भाऊ’वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू मुंबई, ता. ३१ ः सोमवारी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाला यू-ट्युबर ‘हिंदुस्थानी भाऊ’ची फूस असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. आंदोलनावेळी तो तिथेच उपस्थित होता. त्याने सोशल मीडियावरून सरकारला धमकीही दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. त्याच्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर आम्ही आंदोलनात सहभागी झालो असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करू, असा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्याच आवाहनानंतर आज विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन केल्याचे समजते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top