नव्या वर्षात अवयवदान वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या वर्षात 
अवयवदान वेगात
नव्या वर्षात अवयवदान वेगात

नव्या वर्षात अवयवदान वेगात

sakal_logo
By
नव्या वर्षात अवयवदान वेगात सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : नव्या वर्षात अवयवदानाच्या मोहिमेला वेग आला असून जानेवारी या एकाच महिन्यात एकूण पाच अवयवदान पार पडले. मुंबईत २९ जानेवारीला एका खासगी रुग्णालयात ७७ वर्षीय महिलेचे यकृत दान करण्यात आले. हे या वर्षातील चौथे अवयवदान होते. त्यानंतर ३० जानेवारीला नवी मुंबईतील एका रुग्णालयात ५५ वर्षीय पुरुषाचे यकृत आणि किडनी हे दोन अवयव दान करण्यात आले. दरम्यान, आता अवयवदानाला वेग आला असून कोविड काळात जी अवयवदानाची मोहीम मागे पडली होती ती आता पूर्वपदावर येत असल्याचे झेडटीसीसीचे अध्यक्ष एस के माथूर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top