Sun, July 3, 2022

विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा हिंदुस्थानी भाऊला अखेर अटक
विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा हिंदुस्थानी भाऊला अखेर अटक
Published on : 1 February 2022, 3:17 am
अखेर ‘हिंदुस्थानी भाऊ’ला अटक;
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुलांना चिथावणी देऊन आंदोलन करायचे आवाहन करणाऱ्या विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अखेर अटक केली. काल (सोमवार) धारावीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास फाटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.
विकास फाटकसोबत इकराक खान वखार खान या तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१(ब), जमावबंदी आदेशभंगाचे कलम ३७ (३), १३५ आणि महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑनलाईन घेऊ नयेत यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मुंबईमध्ये धारावी परिसरातील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला होता. हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर आम्ही इथे जमलो आहोत, अशी माहिती विद्यार्थ्यांनीच दिली होती.
१० वी आणि १२ वीच्या मुलांचे शिक्षण ऑनलाईन झाले आहे; तर परीक्षा ऑफलाईन का? सरकारने आपला निर्णय बदलावा, नाही तर विद्यार्थी आंदोलन करतील, असा धमकीवजा इशारा असलेला व्हिडीओ विकास फाटकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले होते.
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..