Metro
Metrosakal

भाईंदर: मेट्रो कारशेडसाठी शेतजमिनी देणार नाही; ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

भाईंदर : राई, मुर्धा गावापर्यंत जाणाऱ्या मेट्रो मार्गाला (Metro station) ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतानाही एमएमआरडीएने (mmrda) पोलिस संरक्षाणात मेट्रो मार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. मात्र, आता मेट्रो कारशेडचे सर्वेक्षण (Metro carshed) कोणत्याही परिस्थिती करून दिले जाणार नाही, आमच्या शेतजमिनी (land) मेट्रो कारशेडसाठी देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे मेट्रो वाद आता जास्तच चिघळला असल्याचे स्पष्ट झाले. भाईंदर पश्चिमेपर्यंत येणारी मेट्रो राई गावापर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला आहे. सध्याच्या उत्तन गावाकडे जाणऱ्या रस्त्यावरच मेट्रो मार्ग बांधला जाणार आहे.

Metro
वायू प्रदूषणाबाबत लघुपटातून जनजागृती; ‘असर’ संस्थेकडून निर्मिती

यात स्थानिकांची घरे तुटणार असल्याने या मार्गाला तसेच राई गावाच्या मागील बाजूला होणाऱ्या कारशेडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. मात्र विरोध असतानाही एमएमआरडीने मेट्रो मार्गिकेचे सर्वेक्षण नुकतेच पोलिस बंदोबस्तात पूर्ण केले. त्यानंतर २७ जानेवारीपासून कारशेडचेदेखील सर्वेक्षण सुरू होणार होते. मात्र, ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वेक्षण सुरू होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी एमएमआरडीएचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत एमएमआरडीए आणि उपजिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण होऊ द्या, अशी विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी ती ठामपणे फेटाळून लावली. मेट्रोला आमचा विरोध नाही; परंतु सध्याचा मेट्रो मार्ग आणि कारशेडला तीव्र विरोध आहे. मेट्रो मार्ग सध्याच्या रस्त्यावरून न नेता मुर्धा गावच्या मागील बाजूस असलेल्या विकास आराखड्यातील नियोजित रस्त्यावरून नेण्यात यावी, तसेच मेट्रो कारशेडसाठी खोपरा गावातील सरकारी जमीन किंवा उत्तनमध्ये असलेली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा एमएमआरडीने घ्यावी. कोणत्याही परिस्थिती ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या शेतजमिनी कारशेडसाठी दिल्या जाणार नाहीत.

एमएमआरडीने ग्रामस्थांचा विरोध डावलून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला. मुळात कारशेड होणार असलेल्या जमिनी ग्रामस्थांच्या मालकीच्या असल्याने त्यावर एमएमआरडीए बेकायदेशीरपणे सर्वेक्षण करू शकत नाही, असा मुद्दा उपस्थित करून कारशेड या जागी नकोच, अशी ठाम भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. मेट्रो मार्गाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलेला असतानाही एमएमआरडीने मेट्रो मार्गावर मातीची चाचणी सुरू केल्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे. आयुक्तांची मध्यस्थी मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेले मुद्दे, तसेच सुचवलेल्या पर्यायी जागा वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यत याव्यात तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, असे सांगून बैठक समाप्त होत असल्याचे जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com