esakal | मेट्रो- 4 मार्गिकेचे काम ''या'' कारणामुळे थंडावले!
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो- 4 मार्गिकेचे काम ''या'' कारणामुळे थंडावले!

मेट्रो- 4 मार्गिकेचे काम ''या'' कारणामुळे थंडावले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मेट्रो- 4 च्या मार्गिकेत जमिनीखालील जलवाहिनी आणि महानगरच्या गॅसच्या वाहिन्यांमुळे अडचणी निर्माण होत आहेत. वडाळा-घाटकोपर-भांडुप-ठाणे-कासारवडली हा मेट्रो 4 प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या अडचणीमुळे मेट्रोच्या कामाचा वेग तर मंदावला आहेच, शिवाय प्रकल्पाचा खर्चही वाढण्याची शक्‍यता आहे. एकदंरीतच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत अधिकारी साशंक आहेत. 

काय चाललंय विद्यापिठाचं! पीएचडीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतंय फेलोशिपसाठी आंदोलन 

वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड-कासारवडवली असा 32.32 किमी लांबीचा मार्ग असून यासाठी अंदाजे 1500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गादरम्यान 32 मेट्रो स्थानके असणार आहेत. मुंबईहून ठाण्याला काही मिनिटांतच पोहचता येणे या मार्गामुळे शक्‍य होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकर या मार्गाची प्रतीक्षा करत आहे. हा मार्ग 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या ठिकाणी जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसच्या वाहिन्या मेट्रोच्या खोदकामासाठी अडथळा ठरत आहेत.

मराठी भाषा भाकरीची भाषा बनावी : डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत 

एलबीएस मार्गावर विक्रोळी सूर्यनगर ते मुलुंडच्या जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीपर्यंत साधारण 6.7 किमीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे आहे. या पट्ट्यात सूर्यनगर, पालिका एस विभाग कार्यालय, मंगतराम पेट्रोलपंप, बडवाईक रुग्णालय या ठिकाणी जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसच्या वाहिन्या खोदकामासाठी अडथळा ठरत आहेत. मागील तीन महिन्यांत जलवाहिनी फुटीच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे या वाहिन्या शोधणे, त्यांचा मार्ग बदलणे, समांतर नवी वाहिनी टाकणे, जुनी वाहिनी बाद करणे, अशा कामांत वेळ जात आहे. या फेजचे किमान 60 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सद्यस्थितीत केवळ 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. या वाहिन्यांसाठीची पर्यायी व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर कामाची गती वाढेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 

थोडक्‍यात - मेट्रो 4 प्रकल्प 
एकूण लांबी -
32.32 किमी 
कुठून ते कुठपर्यंत - वडाळा ते कासारवडवली 
प्रकल्पाचा खर्च - 1500 कोटी रुपये 
मार्गातील मेट्रो स्टेशन - 32 

some problems on the Metro-4 route working