Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

पूर्ण लसीकरण होऊनही अनेकांना कोरोना; १८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक संसर्ग

मुंबई : फेब्रुवारी २०२१ मध्ये लशीचा पहिला डोस घेतला. मार्चमध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या लाटेत जूनमध्ये पहिल्यांदाच कोरोनाची लागण (corona infection) झाली; परंतु ऑक्सिजनची गरज भासली नाही. तिसऱ्या लाटेत (corona third wave) जानेवारीमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळली. त्यात खोकला, ताप, सर्दी, तोंडाची चव जाणे आदी प्राथमिक लक्षणे होती. म्हणजेच पूर्ण लसीकरण (full vaccination) होऊनही मुंबईत अनेकांना कोरोनाची लागण झाली. गेल्या वर्षीपासून मुंबईत लसीकरण सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत १ लाख ८२ हजार ५९५ नागरिकांना कोरोना झाला. यापैकी २३,५६२ नागरिकांनी पहिला डोस आणि एक लाख ५९ हजार ३३ जणांनी दुसरा डोस घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.

Corona Vaccination
अवघडचंय! बिना इंजिन कव्हर विमानाचा मुंबई ते भुज प्रवास; चौकशीचे आदेश

मुंबईत कोरोनाचे सावट कमी झाले असले, तरी ज्यांनी कोरोनाविरोधातील लशीचा एक किंवा दोन्ही डोस घेतले आहेत, त्यापैकी अनेकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली; मात्र लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी असल्याने रुग्णांना जास्त त्रास जाणवला नाही. पालिकेच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या डोसनंतर मुंबईत १ फेब्रुवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत १८ ते ४४ वयोगटातील ८० हजारांहून अधिक नागरिकांना ब्रेक थ्रू संसर्ग (दोन डोसनंतरही कोरोनाची लागण होणे) झाला. इतर वयोगटाच्या तुलनेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ब्रेक थ्रू संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. १८ ते ४४ वयोगटातील १.१५ टक्के म्हणजेच ८० हजार ४१५ नागरिकांना हा संसर्ग झाला आहे; तर एका वर्षात एकूण १.८१ टक्के नागरिकांना ब्रेक थ्रू संसर्ग झाला.

आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर, तसेच सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात समाजात वावरतात, त्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांमध्ये मिसळून काम करतात आणि इतर जे या वयोगटातील नागरिक आहेत, त्यांच्यात बेदरकारी मोठ्या प्रमाणात आहे. पार्टी, पब, लग्न समारंभ, जिथे जास्त गर्दी आहे तिथे गेले, मास्क काढला, सोशल डिस्टस्टिंग पाळले नाही, की पुन्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग होतो.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

Corona Vaccination
ठाण्यात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास पुन्हा जिवंत

१५ ते १७ वयोगटात शून्य टक्के

एकीकडे १८ ते ४४ वयोगटात ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण अधिक असताना किशोरवयीन मुलांमध्ये ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण शून्य टक्के आहे. १५ -१७ वयोगटातील मुलांमध्ये पहिला आणि दोन्ही डोस घेतल्यानंतर ब्रेक थ्रूचे प्रमाण ० टक्के आहे; तर पहिला डोस घेतल्यानंतर फक्त ८ मुलांनाच कोविडचा संसर्ग झाला आहे.

काय आहेत ब्रेक थ्रूची कारणे?

मुंबईत जेवढ्या नागरिकांचे लसीकरण झाले त्यापैकी ९९ टक्के सुरक्षित झाले आहेत. लसीकरण झाले नसते, तर अनेकांना संसर्ग झाला असता. ज्या लोकांना कोविडची लागण झाली आहे, याची दोन प्रमुख कारणे आहेत. वेगवेगळ्या आजारांतून रोगप्रतिकार शक्ती कमी झालेले नागरिक, ज्येष्ठ नागरिकांमध्ये सहव्याधी असते. आणि दुसरे कारण म्हणजे योग्य काळजी न घेणे, मास्क न लावणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे, हात न धुणे, यामुळे ते कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. डॉक्टरांना जेव्हा कोविडचा पुन्हा संसर्ग झाला, तेव्हा डॉक्टर रुग्णालयात असताना मास्क लावायचे; पण घरी किंवा रूममध्ये गेल्यावर सर्वांना भेटत होते. त्यामुळे त्यांना संसर्गाचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर आम्ही त्यांना एकत्र भेटणे टाळा किंवा भेटलात तरी मास्क लावा, अशा सूचना दिल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

१ फेब्रुवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२२
पहिला डोस दोन्ही डोस
लसीकरण १,०५,०८,३०४ ८७,७६,५८४
कोरोना संसर्ग २३,५६२ १५,९,०३३
टक्के ०.२२ % १.८१%

वयोगटानुसार ब्रेक थ्रू
वयोगट पहिला डोस दोन्ही डोस ब्रेक थ्रू टक्के
१५ -१७ ३०६८४८ १५,७२६ ८ ०%
१८ - ४४ ६,४२७,५९० ५,३४१,४५१ ८०,४१५ १.१५%
४५-५९ २,४७७,१७१ २,२८०,८०६ ३९,४०० १.७३ %
६० + १,२९,६९५ १,१३८,६०१ ३९,२१८ ३.४४%
एकूण १०,५०८,३०४ ८,७७६,५८४ १५९,०३३ १.८१%

केस स्टडी

आरोग्य कर्मचारी राहुल कच्छवा यांनी ८ फेब्रुवारी २०२१ला लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर, २१ दिवसांनी मार्चमध्ये कोव्हिशील्डचा दुसरा डोस घेतला. डेल्टा व्हेरिएंटच्या दुसऱ्या लाटेच्या अखेरीस त्यांना पहिल्यांदा जूनमध्ये कोरोनाची लागण झाली. १७ दिवसांच्या उपचारांमध्ये ऑक्सिजनची गरज त्यांना लागली नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी लाट आल्यानंतर ते पुन्हा कोविड पॉझिटिव्ह आले. जानेवारीत त्यांना कोविडची लक्षणे आढळली आणि २० दिवस खोकला, ताप, सर्दी आणि तोंडाची चव गेली होती. चार दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि १४ दिवस गृहविलगीकरणात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com