shivrajyabhishek Mural
shivrajyabhishek Muralsakal media

ठाण्यात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास पुन्हा जिवंत

ठाणे : ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) मुख्यालयाच्या दर्शनी भागावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या (shivrajyabhishek sohala) भित्तीशिल्पाचे अनावरण मंगळवारी (ता. ९) नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. अशा पद्धतीचे भित्तीशिल्प (Mural) साकारणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.

shivrajyabhishek Mural
नवी मुंबई : भाजपाला रोखण्यासाठी शेकापची मोर्चेबांधणी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी ठाणे पालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प २५ वर्षांपूर्वी साकारण्यात आले होते. मात्र काळानुरूप त्याच्या डागडुजीची गरज निर्माण झाली. संपूर्णपणे जीर्ण झालेले हे शिल्प नव्याने साकारण्यात यावे यासाठी ठाणेकरांकडून मागणी वाढू लागली. अखेर त्याची दखल पालिकेने घेतली व ऐतिहासिक क्षणाची साक्ष देणाऱ्या या भित्तीशिल्पाचे मंगळवारी अनावरण झाले.

दोन कोटींचा खर्च

हे भित्तीशिल्प साकारण्यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च आला आहे. अतिशय आकर्षक असे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भित्तीशिल्प नवी मुंबई येथील गार्नेट प्रा. लि. या कंपनीने तयार केले आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये सुबक अशी प्रतिकृती साकारण्यात आली. त्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com