सत्कर्म फाऊंडेशनच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण

सत्कर्म फाऊंडेशनच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण

Published on

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे बक्षीस वितरण साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत संपन्न झाले. फाऊंडेशनचे संचालक अनुज नरुला, संचालक दत्तात्रय सावंत यांच्या वतीने शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाचे वकील अनुज नरुला यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक सृष्टी उबाळे (७ वी), द्वितीय पारितोषिक साक्षी माने (६ वी), तृतीय पारितोषिक आर्या धमक (५ वी), तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्नेहल माने (१० वी), द्वितीय पारितोषिक साक्षी वाटेगावकर (१२ वी), तृतीय पारितोषिक दिनेश चौधरी (१० वी) याला देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मानसी हातणकर (९ वी), द्वितीय पारितोषिक गायत्री भागवत (३ री), तृतीय पारितोषिक अनुष्का जगदाळे (८ वी) प्राप्त झाले. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com