अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई
अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई

अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली शहरात विद्रुपीकरणात भर घालणारी विविध प्रभाग क्षेत्रातील बॅनर्स, शेड्सवर पालिकेतर्फे धडक कारवाई करण्यात आली. पालिका पथकाने डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर, रामनगर परिसरातील ३५ बॅनर्स हटविले असून कल्याण पूर्व काटेमानिवली रोड, वालधुनी, जकात नाका या परिसरातील ४१ बॅनर, होर्डिंग काढण्यात आले आहेत. कल्याण पूर्व परिसरात पुनालिंक रस्ता ते विजय नगर, आमराई या रस्त्यावरील फूटपाथवर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, वेदर शेड, बाकडे, हातगाड्यावर तोडक कारवाई करण्यात आली, तर डोंबिवली पूर्व येथील कल्याण रस्ता, नेहरू रस्ता, फडके रस्ता, मानपाडा रस्ता येथील सुमारे ४९ बॅनर्स काढण्याची धडक कारवाई करण्यात आली असून आगामी काळात अशा धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top