
पालघर नगरपरिषदेची विकासकामे संथगतीने
पालघर, ता. १३ ( बातमीदार) ः पालघर नगर परिषदेने आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावनेत नगर परिषद इकडे विकास कामासाठी पुरेसा निधी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विकासात्मक कामे करताना नगर परिषदेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पालिकेच्या काही विभागांसाठी मोठा खर्च केल्याचे दिसत असून न झालेल्या कामांची संख्या ३५ इतकी आहे, तर बंद कामांची यादी ही मोठी असून अपूर्ण कामांची संख्याही मोठी आहे.
एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०१९ या सात महिन्यांत गटारे व नालेसफाई यासाठी एक कोटी २३ हजार रुपये खर्च झालेले आहेत. मात्र शहरात स्वच्छतेची कामे झाल्याचे दिसून येत नाही. शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. गटारे तुंबलेली आहेत. जंतुनाशक औषधे खरेदीसाठी २५ लाख २२ हजार हजार ४०० रुपये, मलेरिया औषध खरेदी व फवारणी ४४ लाख, स्वच्छता व सफाईसाठी एक कोटी १६ लाख ३९ हजार चारशे रुपयांसह अंदाजपत्रकात चार कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. जेसीबी डंपर पुरवठा यासाठी ४६ लाख ७७ हजार ४४५ रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. रुग्णवाहिका खरेदीसाठी ४० लाख दहा हजार रुपये, तर वैद्यकीय अधिकारी संनियंत्रण पन्नास खाटांसाठी ३७ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियान अनुदानातून ७६ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र निधी खर्च झाल्याचे सांगताना मात्र कामे झाल्याचे दिसत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
नगर परिषद कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी एक कोटी २५ लाख, तर सुरक्षा रक्षकासाठी ५० लाख, तांत्रिक सल्लागार फी १५ लाख, अभियांत्रिकी सेवा ७ लाख एवढा खर्च करूनही पालघर शहरातील स्वच्छता अभियानाचा फज्जा उडालेला आहे
पालघर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध बाबींसाठी प्रचंड खर्च करूनही पालघरकरांचे आरोग्य काही चांगले नाही.पालघर- मनोर रस्त्यावरही कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली आहे. कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले दिसून येतात.
- नितांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष, पालघर नगर परिषद.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..