
चित्र रथाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जागृती
मोखाडा, ता. १३ (बातमीदार) ः जिल्ह्यातील गावपाडे, वाडी, वस्तीत स्वच्छतेचे महत्त्व आणि जनजागृती व्हावी, स्वच्छतेविषयी लोकचळवळ उभी रहावी म्हणून पालघर जिल्हा परिषदेने डिजिटल स्वच्छता रथाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या रथाचे मोखाड्यात लोकप्रतिनिधींनीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गाव, पाड्यात लघुपट, माहितीपट दाखवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
स्वच्छता रथाचे मोखाडा पंचायत समितीच्या सभापती आशा झुगरे, उपसभापती लक्ष्मी भुसारा, गटविकास अधिकारी संगीता भांगरे, पंचायत समिती सदस्य युवराज गिरंधले, भास्कर थेतले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे.
या अभियानाचे लोक चळवळीत रूपांतर होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिष्ठा जोपासून, स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्या, असे आवाहन स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांनी केले आहे. या डिजिटल रथाची प्रस्तावना मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी तयार केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..